Ad will apear here
Next
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ ठरली सर्वोत्कृष्ट स्टार्टअप
‘सीप’तर्फे आयोजित ‘पुणे कनेक्ट’ परिषदेत गौरव
पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’ला तालवाद्यवादक तौफिक कुरेशी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे : कामाच्या ठिकाणी आपल्या विभागातील पिण्याचे पाणी संपले असेल, किंवा स्वच्छतागृहे स्वच्छ नसतील, तर आपण संबंधितांकडे तक्रार नोंदवतो आणि समस्या सोडवली जाण्यासाठी वाट पाहतो. अशा प्रसंगांमध्ये जाणारा वेळ आणि होणारी गैरसोय टाळून साध्या ‘क्यू-आर कोड’च्या माध्यमातून आपली गरज व्यवस्थापकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पुण्यातील ‘सिग्मापेरॉन’च्या ‘असिस्ट-डी’ या रिअल टाईम व्यवस्थापन सोल्यूशनला यंदाच्या ‘पुणे कनेक्ट’मध्ये सर्वोत्कृष्ट स्टार्टअप पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रसिद्ध तालवाद्यवादक तौफिक कुरेशी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  

सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे अर्थात ‘सीप’तर्फे ‘पुणे कनेक्ट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्टार्टअप स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. सीपच्या कार्यकारी समितीचे सदस्य व पुणे कनेक्टचे प्रमुख अभिजित अत्रे, सीपचे अध्यक्ष अश्विन मेघा, उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, ‘पुणे कनेक्ट’चे कार्यक्रम संचालक स्वप्नील देशपांडे या वेळी उपस्थित होते.

पाणीटंचाई असलेल्या भागात दुरून पाणी आणणे सोपे करणाऱ्या ‘नीर चक्र’ या उपकरणासाठी ‘ट्री इनोव्हेशन फाउंडेशन’ या स्टार्टअपला द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘शेअर्ड मोबिलिटी सेवा’ पुरविणाऱ्या ‘ऑल माइल्स’ या स्टार्टअपला तृतीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या वर्षी पुणे कनेक्टसाठी ७५ स्टार्टअपकडून अर्ज आले होते. त्यातील निवडक ३४ स्टार्टअपमधून अंतिम पाच स्टार्टअपना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसमोर सादरीकरण करायला मिळाले. त्यातून तीन विजेत्यांची निवड करण्यात आली. ‘अलॅक्रिटी’चे गिरींद्र कसमळकर, ‘रोल्सरॉइस’च्या पार्टनरशिप एंगेजमेंट विभागाच्या प्रमुख राजश्री राव, ‘केपॉइंट’चे संस्थापक श्रीधर शुक्ला यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

याशिवाय परिषदेत या वर्षीपासूनच सुरू करण्यात आलेल्या कॉर्पोरेट पुरस्कारांमध्ये ‘सिनेक्रॉन’ला ‘बेस्ट इनोव्हेशन अंत्रेप्रिन्युअरशिप स्ट्रॅटेजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘एक्स्पान्शिअन’ कंपनीस ‘बेस्ट इंडस्ट्री अॅकॅडमिआ कनेक्ट’ पुरस्काराने, तर ‘थॉटवर्क्स’ कंपनीस ‘बेस्ट डायव्हर्सिटी अँड इन्क्लूजन स्ट्रॅटेजी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZBNCH
Similar Posts
‘क्विकहील’ला ‘डीएससीआय’तर्फे पुरस्कार मुंबई : क्विकहील टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘डीएससीआय एक्सलन्स अॅवॉर्ड २०१९’मध्ये नासकॉमच्या डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे (डीएससीआय) ‘सायबर सिक्युरिटी प्रॉडक्ट पायोनियर इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
काँक्रीटची मजबुती मोजणारा भारतीय बनावटीचा पहिला ‘मॅच्युरिटी मीटर’ विकसित पुणे : बांधकामात वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटची मजबुती मोजण्यासाठी ‘पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रीसर्च फाउंडेशन’ने (पीसीईआरएफ) संपूर्णतः भारतीय बनावटीचे ‘मॅच्युरिटी मीटर’ हे उपकरण देशात प्रथमतः विकसित केले आहे. या मॅच्युरिटी मीटरची किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परदेशी मॅच्युरिटी मीटरच्या किमतीच्या केवळ ३५ ते ४० टक्के इतकीच आहे
‘पानिपत’च्या कलाकारांनी पाहिले चित्रपटासाठी घडविलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन पुणे : बहुचर्चित पानिपत या ऐतिहासिक चित्रपटासाठी पुण्यातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ने आठशेपेक्षा जास्त प्रकारचे दागिने घडवले आहेत. या चित्रपटाच्या कलाकारांनी नुकतीच पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांच्या औंध येथील दालनाला भेट दिली. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेता अर्जुन कपूर, कृति सेनन आणि सुनीता गोवारीकर यांचा समावेश होता
‘टाटा प्रोजेक्ट्स’ला आयआयटी संस्थांमध्ये उदंड प्रतिसाद मुंबई : टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व सर्वांत प्रशंसाप्राप्त संरचना कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने या वर्षी दिल्ली, मुंबई, मद्रास, कानपूर आणि खरगपूर या भारतातील आघाडीच्या पाच आयआयटी संस्थांमधून ५० इंजिनीअर्सची नियुक्ती केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language